माझी शाळा निबंध | mazi shala marathi nibandh

माझी शाळा निबंध : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये माझी शाळा निबंध मराठी  या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्येमाझा माझी शाळा माहिती बघणार आहोत .

माझी शाळा निबंध -bhag 1

नमस्कार माझ्या या ज्ञानमंदिरा।

सत्यम् शिवम् सुंदरा ॥

माझे सर्वात आवडीचे स्थान म्हणजे माझी शाळा. मी माझे दिवसाचे सहा तास माझ्या शाळेत घालवतो. मला माझ्या जीवनातील आतापर्यंतचे सर्वात चांगले अनुभव हे शाळेतून मिळाले अहित.

माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय आहे. शाळेची इमारत भव्य आणि मोकळी आहे.मला माझ्या जीवनातील आत्तापर्यंचे   सर्वात चांगले  अनुभव हे शाळेतून मिळाले आहेत. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय आहे. शाळेची इमारत भव्य आणि मोकळी आहे. माझी शाळा परिसरातील सर्वात सुंदर शाळा आहे. शाळेच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होतं. शाळेची इमारत चार मजली आहे. शाळेत माझे भरपूर मित्र आहेत. मी त्यांच्यासोबत खेळतो, गप्पा करतो. माझ्या शाळेत इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे वर्ग आहेत. माझ्या शाळेत उच्च शिक्षित शिक्षक आहेत. ते आम्हाला प्रत्येक विषयात उत्तम मार्गदर्शन करतात. माझ्या शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळण्यासाठी मैदान अशा सुविधा उपलब्ध आहेत .

शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात  मला दररोज माझ्या शाळेत नवी न काहीतरी शिकायला मिळते. आज माझ्यात जो बदल झाला आहे तो फक्त माझ्या शाळेमुळे. शाळेतील गोड अनुभव नेहमी माझ्या आयुष्यात माझ्या सोबत राहतील. माझी शाळाच माझ्यासाठी देवस्थान आहे .

माझी शाळा निबंध ! mazi shala marathi nibandh bhag 2

शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच महत्त्वाची असते. आपल्यावर होणारे संस्कार या शाळेतूनच होत असतात. येथून आपल्या भावी आयुष्याची शिदोरी आपल्याला मिळत असते, जी की संपूर्ण आयुष्यात आपल्या सोबत असते.

माझ्या शाळेचे नाव  सरस्वती  विद्यालय  आहे. माझ्या शाळेची इमारत खूपच मोठी आहे.

माझ्या शाळेत इयत्ता १ली पासून १२ वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. कक्ष आणि प्रयोगशाळा देखील आहे. माझा माझ्या शाळेच्या समोर खूप माठे मैदान आहे. तेथेच आमच्या शाळेचे सर्व खेळाचे आयोजन केले जाते. आमच्या शाळेत अभ्यासाबरोबर खेळाला देखील तेवढेच महत्त्व दिले जाते. याच मैदानावर कबड्डी, खो-खो आणि क्रिकेटचे सामने खेळले जातात. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खपच प्रेमळ आणि दयाळू आहेत. शिकवतात ही छान ते व विद्यार्थांना विषय अगदी सहजपने समजावा यासाठी दैनंदिन

जीवनातील उदाहरणे देऊन विषयातील संकल्पना स्पष्ट करतात. जेणेकरून विद्याथ्यांना विषयातील कठीण संकल्पना देखील लवकर समजतील. हया शाळेने मला खूप काही दिले आहेत. खूप सारे संस्कार मला या शाळेतून मिळाले आहेत. शाळेतील अनेक सुंदर अनुभव माझ्या मनात साठवले आहत. माझी शाळा मला खूप आवडते आणि ती माझ्यासाठी नेहमीच आदर्श आहे.

माझी शाळा निबंध ! mazi shala marathi nibandh bhag 3

शाळा असते दिवा, शिक्षक त्याची वात ॥

स्वत: जळतात, पण ज्ञानाचा प्रकाश देतात.||

माझ्या शाळेचे नाव जिजामाता कन्या प्रशाला आहे , हि शाळा गावाच्या मध्यभागी आहे. शाळा 2 एकर जमिनीवर वसलेली आहे. ज्यात शाळेची भव्य अशी दुमजली इमारत. व एक मोठे मैदान आहे . माझी शाळा मराठी व सेमी इंग्रजी अशा दोन माध्यमांची आहे.

माझी शाळा संपूर्ण जिल्हयात परिचित आहे. हि पिवळ्या रंगाची आहे. माझ्या शाळेत ३५ खोल्या व त्यात ५ हॉल आहेत. त्यात 2 मोठे संगणक लॅब व 3 प्रयोगशाळा आहेत.

माझ्या प्राचार्यांचे नाव शिंपी आहे. ते एक अतिशय उदार व्यक्तीमत्वाचे व्यक्ती आहेत. प्राचार्यासमवेत एकूण 32 शिक्षक आहेत त्यात 24 पुरुष व ७ महिला शिक्षक आहेत. तसेच क्रिडा व योगाभ्यास शिक्षक देखील आहेत.

 शिकवण्याची एक वेगळीच पद्धत माझ्या शाळेत आहेत.. प्रयोगशाळेत प्राक्टिकल घेणे व विज्ञान प्रयोगांचे वेळो- -वेळी पर्यवेक्षण करणे. प्रकल्प बनवण फॅशन व सांस्कृतिक उपक्रमामध्ये भाग घेणे.

माझ्या शाळेत दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जातात. वर्षातून र वेळा सहलीचे आयोजन केले जाते. तसेच कबड्डी, क्रिकेट यासारख्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. तसेच सर्व सण- उत्सव एकत्तात साजरे होतात.

शाळेला ज्ञानाचे मंदिर म्हणतात. शाळा म्हणजे महान व्यक्तींच्या उगमाचे स्थान एक चांगली शाळा देशाच  शाळा म्हणजे महान व्यक्तींच्या उगमाचे स्थान, एक चांगली शाळा देशाच्या विकासात बदल घडवू शकते. या सर्व गुणसंपन्न अशी माझी शाळा आहे. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. म्हणून माझी शाळा मला खूप आवडते .

या लेखात आपण माझी शाळा निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Related Content :