15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | Independence day essay in Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध :नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये   15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध  मराठी या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये   15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध  बघणार आहोत .तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत  नक्की वाचा .

 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध

आज पंधरा ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन आणि ७८ वा स्वातंत्र्यदिन. समस्त भारतीयांचा ऊर भरून यावा असा हा दिवस. ये मेरे वतन के लोगो…. ये भारत देश है मेरा…. बलसागर भारत होवो… हे राष्ट्र देवतांचे….. अशी अनेक हिंदी-मराठी गाणी या राष्ट्रीय दिनी आसमंतात सूर आळवू लागतात अन् ऐकणाऱ्या अनेकांच्या नसानसातून रक्त सळसळू लागतं. हाताची वज्रमूठ करून मनगटे वळवळू लागतात. प्रत्येकाचा ऊर देशप्रेमाने भरून जातो. खरेच देशप्रेम ही अशी एक शक्ती आहे की देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला माणूस हसत हसत फासावर चढतो. वंदे मातरम् म्हणत छातीवर शत्रूच्या गोळ्या झेलतो. स्वतःच्या घरादारावर नांगर फिरवतो. खरंच या प्रेमाची इतर कुणाशीही तुलना होऊच शकत नाही.

दीडशेहून अधिक वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी आपल्याला गुलाम बनवले. आपली आर्थिक पिळवणूक केली. आपली संस्कृती; आपला इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला. लोकांमधली अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती नष्ट केली. एक चेहरा नसलेला, अस्मिता

हरवलेला, मुखभंग झालेला हतप्रभ समाज इंग्रजांनी भारतात निर्माण केला.

स्वयंपूर्ण खेडी परावलंबी बनवली. लघुउद्योग नष्ट केले. बहुसंख्यांना न समजणाऱ्या अशा इंग्रजी भाषेचा वापर वाढवला. फोडा आणि झोडा ही नीती अवलंबवली आणि त्याच जोरावर भारतावर विनासायास राज्य केले.

त्याकाळी अनेक भारतीय तरुणांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच स्वातंत्र्य, बंधुता, समता या तत्त्वांची त्यांना ओळख होऊ लागली. लोक जागृत होऊ लागले.

संपूर्ण भारतात पुणे हे नव्या वैचारिक चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले होते. इथूनच संपूर्ण भारतावर प्रभाव टाकणारे अनेक राजकीय, सामाजिक नेते निर्माण झाले. चळवळी सामाजिक- राजकीय असो वा क्रांतिकारी लोकांच्या संघटना असो त्या सर्वांचे मूळ आपल्या पुण्यात धरू लागले. इथल्या लोकांकडून प्रेरणा घेऊन संपूर्ण भारतात अनेक लोकांनी राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढाकार घेतला.

सुरुवातीच्या काळात भारतीय लोकांच्या मनात आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल आदर निर्माण व्हावा आपणही एका उज्ज्वल आणि समर्थ अशा संस्कृतीचे, परंपरेचे वारसदार आहोत हे पटवून देण्यासाठी विपूल ग्रंथ लिहिले गेले. अनेक संघटना तयार झाल्या. अनेक पंथ धर्म तयार झाले. त्यातूनच भारतीय मन स्वातंत्र्यासाठी, मिळवण्यासाठी, ते मिळवताना करण्यात येणाऱ्या त्यागासाठी तयार होऊ लागले.

त्यातूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची १८८५ साली स्थापना झाली. विनंती अर्ज करून इंग्रज सरकारकडे मागण्या मागणारी काँग्रेस पुढे जहाल मतवादी बनू लागली. त्यातूनच अनेक देशभक्त तरुण लढ्यासाठी तयार होऊ लागले. टिळक, आगरकर, सावरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकहितवादी, कर्वे, गोखले, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची फळी विविध क्षेत्रात तयार झाली. महात्मा गांधी तर महाराष्ट्राला “कार्यकर्त्यांचे मोहोळ” असे म्हणत असत. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे” अशी गर्जना करणारे टिळक हे तर एक देशमान्य नेते होते. त्यांच्या नंतर संपूर्ण भारताचे राजकीय नेतृत्व सांभाळणाऱ्या महात्मा गांधींनी तर स्वातंत्र्य चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवली.

क्रांतिकारी मार्गाचा स्विकार करून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक क्रांतिवीर स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर इंग्रज सरकारने पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. स्वातंत्र्यवीरांपासून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी देशासाठी आपले बलिदान दिले. अखेरीस संपूर्ण भारतीय जनता त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठे असे सारे भेद विसरून इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले. तेव्हा इंग्रजांना हा भारत देश सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही आणि त्यातूनच १५ऑगस्ट १९४७ या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.

१४ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री बारा वाजता लाल किल्ल्यावरचा युनियन जॅक उतरवला गेला आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या अभिमानाने, साश्रूनयनाने तिरंगा झेंडा लाल किल्लावर फडकवला. तो फडकणारा झेंडा पाहून समस्त भारतीयांचा ऊर भरून आला. संपूर्ण

देशामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक वर्षांच्या गुलामगिरीचा, दडपशाहीचा, अन्यायाचा प्रतिकार करून, प्रसंगी रक्ताचा सडा भारतीय भूमीवर शिंपडून भारतीय जनतेने हे यश मिळवले होते आणि म्हणूनच याचे महत्त्व खूप जास्त आहे. स्वातंत्र्याचा फायदा सर्वांना व्हावा, तसेच देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने व्हावा म्हणून पंडित नेहरू, वल्लभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, लालबहादूर शास्त्री अशा अनेक राष्ट्रीय आंदोलनातील नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपली उत्तम अशी राज्यघटना तयार केली आणि त्यानुसार आपल्या देशाचा कारभार सुरू झाला. खरंच महात्मा गांधींनी दिलेल्या अहिंसा या तत्त्वाचा अंगीकार करून भारतीयांनी मिळवलेले स्वातंत्र्य हे जगभरातील अनेक देशांना प्रेरक असे ठरले.

१५ ऑगष्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. गरिबीने पिचलेल्या जनतेच्या मनात चांगल्या जीवनाची आशा निर्माण झाली. खायला अन्न, राहायला घर आणि हाताला काम एवढीच माफक इच्छा जनतेची होती! खरे तर इंग्रजी राजवटीत भारतीय शेती व्यवसाय रसातळाला गेला होता. जलसिंचनाच्या सोयीसुविधा नव्हत्या औद्योगिक उत्पादन अगदीच नगण्य पातळीवर होते. खरे तर त्यावेळच्या राज्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी होती.

एका बाजूला जनतेच्या आकांक्षा पूर्ण करायच्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला भारतात लोकशाही रुजवतानाच शेती-उद्योग-सेवा क्षेत्रात भरारी मारायची होती. मग देशातील बॅकांचे आणि पेट्रोलियम कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण असो; वा मोठमोठे धरण प्रकल्प वा मोठमोठ्या जलसिंचन योजना असोत त्या धडाडीने राबल्या गेल्या. एका ध्येयवादी वृत्तीने देशाचा कारभार सुरू झाला. पण हळूहळू स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेल्या नेत्यांची फळी राजकारणातून बाजूला होऊन नवी पिढी आली. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली तरुणाई राज्यकारभार पाहू लागली आणि तो ध्येयवाद तो आदर्शवाद ते नीती मूल्य अशा एकेक गोष्टी आपण हरवू लागलो. त्यातूनच भारतामध्ये बेरोजगारी, दुष्काळ, धर्म, जात या बरोबरच भाषाविषयक प्रश्न डोके वर काढू लागले. भारताच्या प्रगतीचा आलेख खालावू लागला.

Related Content :


Leave a Comment