माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये माझा आवडता ऋतु: पावसाळा निबंध या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतु: पावसाळा माहिती बघणार आहोत .
माझा आवडता ऋतु: पावसाळा निबंध – भाग १
पृथ्वीवरती अनेक ऋतू असतात पण सर्व ऋतूंपैकी मला पावसाळा खूप खूप आवडतो. पावसाळ्यात खूप भिजता येतं, कपडे ओले होतात. आई ओरडते. आपण आजारी पडतो. आई कडू कडू औषध देते. जेव्हा पाऊस येतो तेव्हा बाहेरचे नाराज फुल खुश होतात म्हणजेच बाहेरची सुकलेली फुले फुलतात आणि गवत, झाड, हिरवेगार होतात, बाहेर पाण्यात कागदाच्या होड्या बनवून खेळायला मिळते चिखलात उड्या मरतांना फार आनंद होतो.
पावसाळा चालू झाला की सारे वातावरणच बदलून जाते. नद्या दुथडी भरून वाह लागतात. सारीकडे हिरवीगार राने दिसू लागतात. गवताच्या हिरव्या लाटा वाऱ्यावर डोलू लागतात. त्यातील रंगीबेरंगी रानफुले मनाला मोहुन टाकतात. सारी सृष्टी जणू हिरवा शालू नेसून सजते. मला ओल्या मातीचा वास खुप आवडतो.
हा पावसाळा शेतकऱ्यांना तर अत्यंत आवश्यकच असतो. त्याच्या कृपेनेच शेते पिकणार असतात, धान्य तयार होणार असते. तेव्हा शेतकऱ्यांचा तर वर्षाऋतू अतिशयच प्रिय असतो. या ऋतूत निसर्ग रंग, रूप, गंध यांची आरास मांडतो. निसर्गाच्या अंगप्रत्यांगातून, वृक्षलतांमधून, पानाफुलांतून चैतन्य प्रत्ययास येते. साऱ्या सृष्टीला हा ऋतू वैभवाचे लेणे बहाल करतो.
पाऊस कधी इतका पडतो कि सगळी कडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो तो खूप छान दिसतो. सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. मी कधी बगीतला नाही पण आई सागते कि
पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो मला तो नाच नक्की बगायला आवडेल. पावसात आम्हाला शाळेला सुट्टी मिळते, गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.
माझा आवडता ऋतु: पावसाळा निबंध – भाग 2
पाऊस सुरु होण्या आधी, उन्हाळ्याच्या गर्मी ने संपूर्ण जमीन तापलेली असते. लोग गर्मीत येणाऱ्या घामा ने अस्वस्थ झालेली असतात, आणि ते ढगांन कडे पाहू लागतात सगळ्यांचा मनात एकच इच्छा असते, ती म्हणझे कधी हा पावसाला सुरु होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो.
आणि मग रिमझिम पावसाळा सुरवात होते, आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि गान म्हणतो ” ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस अल्ला मोटा” पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो मला खूप आवडतो.
पाऊस पडल्याने सर्वी झाडे हिरवीगार होतात आणि गर्मी ने तापलेल्या वातावरणात गारवा येतो. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आटलेले नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात. शेतांच्या कामाला सुरवात होते, पावसानमुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्या मध्ये शेता मदे पिक डोलू लागते.
पाऊस कधी इतका पडतो कि सगळी कडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो तो खूप छान दिसतो. सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. मी कधी बगीतला नाही पण आई सागते कि पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो मला तो नाच नक्की बगायला आवडते .
पावसात आम्हाला शाळेला सुट्टी मिळते, गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.
माझा आवडता ऋतु: पावसाळा निबंध – भाग 3
नभ गरजूनी, थेंब बरसूनी
आल्या पावसाच्या धारा ,
अल्लड वारा गुंजला कानी
न्हावून गेला आसमंत सारा…
पृथ्वीवरती सजलेला निसर्ग हा एक अलंकार आहे. दिवसांनुसार, महिन्यांनुसार निसर्गाचे आपल्याला वेगवेगळे रूप दिसते, ते म्हणजे नैसर्गिक चक्र होय.
पृथ्वीवरती हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे महत्वाचे ऋतू आहेत. अशा ऋतूनुसार निसर्ग आपले सौंदर्य दाखवितो. त्यातील पावसाळयात रंगलेले निसर्गाचे सौंदर्य मला खूप आवडते. म्हणून माझा आवडता ऋतू पावसाळा आहे.
जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते, त्याच्या आसपास पावसाळा सुध्दा सुरू होतो. पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळयातील कडक उन्हामुळे संपूर्ण जमीन तापलेली असते. रिमझिम पडणारा पाऊस जमिनीची तहान भागवितो. सर्वत्र गारवा पसरतो. जमिनीतून मातीचा येणारा सुगंध मला खूप आवडतो.
पावसाळयात सर्व झाडे हिरवीगार होतात. सर्व आटलेल्या नदया पुन्हा वाहू लागतात. पाऊस कधी रिमझिम पडतो, तर कधी धो-धो कोसळतो. जोरात पाऊस पडला की आमच्या घराभोवती तळे साचते. तेंव्हा आम्ही कागदाच्या होडया करून पाण्यात सोडतो. आणि आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो.
पाऊस पडला की कधी – कधी रंगीबेरंगी इंद्रधनुष्य बघायला मिळते. पाऊस पडला की मोर सुध्दा आनंदित होतो आणि आपला पिसारा फुलवून तो रानात नाचू लागतो.
पावसाळयामध्ये बाहेर पाऊस आणि घरामध्ये गरम भजी आणि चहा पिण्याचा आनंद विलक्षण असतो. आणि पावसात भिजायची मज्जा काही वेगळीच …..
पावसात भिजत आम्ही भोलानाथचे गाणे सुध्दा म्हणतो, ” सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुटटी मिळेल कार्य ” पाऊस आला आणि गारा पडू लागल्या की अंगणात जाऊन पडलेल्या गारा वेचून खायला मला खूप आवडते.
पाऊस सुरू झाला की सगळीकडे पाणीच पाणी असते. पाऊस हा हवेत गारवा आणतो. सर्व झाडे स्वच्छ धुवून निघतात. झाडांना पाणी मिळते. सर्व रस्ते, घरांची छपरे धुवून निघतात. उन्हाळयात सुकलेली झाडे पुन्हा बहरतात, हिरवीगार दिसतात. हे सर्व पाहून मन प्रसन्न होते.
पाणी हे जीवन आहे. पृथ्वीवरील पशु-पक्षी, झाडे, वेली यांना पाण्याची फार गरज असते. ही गरज पावसामुळे पूर्ण पाऊस सुरू झाला की शेतकरीसुध्दा खुश होतो. कारण जमिनीत बी-बीयाणे पेरून तो आतुरतेने पावसाची वाट बघत असतो. नदयांचे पाणी अडवून शेतकरी शेतात पिके, भाजीपाला पिकवतो.
पिकवतो. संपुर्ण पावसाळ्यात हिरवीगार वातावरण थंड होते. आम्हाला पावसात भिजायला, खूप मज्जा करायला मिळते. कधी शाळेला सुटटीसुध्दा मिळते. म्हणून मला पावसाळा ऋतू खूप आवडतो.
या लेखात आपण माझा आवडता ऋतु: पावसाळा निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Related Content :
- mahatma jyotiba phule speech in marathi | महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण
- दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh In Marathi
- माझी शाळा निबंध | mazi shala marathi nibandh
- मराठी निबंध लेखन | Essay writing in Marathi
- प्रदूषण एक समस्या निबंध | Pradushan ek samasya marathi nibandh
- माझा आवडता कलावंत मराठी निबंध | maza avadta kalavant nibandh in marathi
- मला पडलेले स्वप्न मराठी निबंध | mala padlele swapn essay marathi