दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh In Marathi

दिवाळी निबंध मराठी : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये “माझा आवडता सण दिवाळी” या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये दिवाळी म्हणजे काय दिवाळी का साजरी केली जाते या सर्व माहिती बघणार आहोत .

निबंध सुरु करण्याआधी सर्वप्रथम निबंधामध्ये या महत्त्वाच्या ओली असणे फार गरजेचे आहे ,

 दिवाळी निबंध मराठी

दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,

फराळाचा गोडवा , जिभेवर असू दे,

नात्यांची वीण अशी, कायम घट्ट होऊदेत..

दीपावली च्या शुभेच्छाची, बरसात होऊदेत।

-“प्रा. कांचन (शैली) ”

सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिवाळी म्हटली की आनंद आला,उत्साह आला,जल्लोष आला सर्व ठिकाणी lighting चा झगमगाट असतो. आपण नवीन कपडे घेतो नवीन वस्तू खरेदी करतो. छान छान मिठाई फटाके त्याचबरोबर आपण सर्व एकत्र असतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळेच ही दिवाळी लहानांपासून थोऱ्यांपर्यंत सर्वांना हवी हवीशी वाटते ,आनंदाची वाटते , उत्साहाची वाटते. परंतु मित्रांनो या दिवाळी साजरी करण्यामागची सुद्धा भरपूर कथा इतिहासामध्ये प्रचलित आहे.

तर त्यातली सर्वात महत्त्वाची कथा अशी आहे कि ज्यावेळेस श्रीराम त्यानंतर त्यांची पत्नी सीतामाता आणि त्यांचे बंधू लक्ष्मण हे ज्यावेळेस चौदा वर्षे वनवास बघून अयोध्येमध्ये आले होते .त्याच वेळेस अयोध्यावासीयांनी त्यांच्या आनंदामध्ये किंवा त्यांच्या आगमनामध्ये पूर्ण नगरी साफसफाई करून दिवे लावून त्यांचं स्वागत केलं होतं. त्यामुळे सुद्धा य दिवशी दिवाळी साजरी केली जाते .

त्याचबरोबर पांडवांनी ज्यावेळस कौरवांसोबत त्यांच्या खेळामध्ये त्यांचं सर्व काही गमावला होत आणि त्याचबरोबर त्यांना बारा वर्ष वनवास सुद्धा भोगावा लागला होता . आणि हा वनवास संपवून ज्यावेळेस ते हस्तिनापूर मध्ये आले तेव्हा हस्तिनापूर वासियांनी त्यांच्या  स्वागतासाठी पूर्ण नागरी स्वच्छ करून दिवे लावून सगळीकडे रोषणाई करून त्यांचं स्वागत केला होतं .

आणि तिसरी कथा अशी आहे की , ज्यावेळेस श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला नरकासुर हा खूप भयंकर राक्षस होता , त्याने खूप स्त्रियांना त्रास दिला त्याने जवळ जवळ ६००० स्त्रियांना बंधिस्त करून ठेवला होता . अशा या नरकासुराचा वध श्रीकृष्णाने याच दिवशी केला होता .

चौथी कथा अशी की , ज्यावेळी रा क्षाचे आणि देवतांचे समुद्रमंथन झाले या वेळी सागरमंथन मधून लक्ष्मी मातेचा जन्म झाला . त्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन केला जाता .

तर अशा प्रकारे दिवाळी साजरा कारण्यामागच्या बऱ्याचशा कथा प्रचलित आहेत . परंत या कथांमागचा संदर्भ संदेश एकच आहे . तो म्हणजे कि आपण बघतो दिवाळीला सर्व परिसर खूप स्वछ वास्तू खुप सुंदर असतो . त्याच मागचं कारण असं आहे कि आपण सुद्धा आपल्या मनामध्ये असलेल्या काही जुने आठवणी ज्या खूप दिवसापर्यंत दब धरून बसलेला आहे. काही गैरसमज असतील किंवा काही दुसऱ्यांसोबत काही चुकीचा व्यवहार असेल तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या परिसराच्या स्वच्छतेबरोबर आपल्या मनाची स्वच्छता करून सुद्धा या आपण साथ केल्या पाहिजेत.

आपण दिवाळीला खूप नवीन वस्तू नवीन वस्तू घेतो.तर असं का?

तर दिवाळी म्हणजे नाविन्याचं प्रतीक आहे. तर आपण सुद्धा या दिवाळीला एक नवीन आचार नवीन विचार त्याचबरोबर एक नवीन सवय आपल्याच रुजवली पाहिजे. आणि आणखी दिवाळीला आपण छान छान gift उपहार स्वरूप देत असतो. छान छान वस्तू उपहार स्वरूप देत असतो. तर आपण सुद्धा इतरांना ते जसे आहेत तसे स्वीकारणं हे gift आपण  त्यांना दिलं पाहिजे. हा उपहार त्यांना दिला पाहिजे.

तर आणि आणखी म्हणजे दिवाळीला आपण खूप ठिकाणी दिवे लावतो. कारण कि दीपावलीचा अर्थच असा असतो कि दिवे लावणे दिव्यांची माळ तयार करणे. तर तसं का कि दिवाळी लावणे हे एक शुभ मानलं जातं. कारण कि दिव्याचं एक खूप छान वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे काय कि दिवा हा स्वतः स्वतः जवळून इतरांना प्रकाश देत असतो. त्याचप्रमाणे आपण आपण सुद्धा इतरांना मदत केली पाहिजे छान छान त्यांना प्रेम दिलं पाहिजे त्यांना आनंद दिले पाहिजे. त्यांच्याशी तर या नवीन वर्षामध्ये आपण वर्षभर केलेल्या काही चुका असतात किंवा काही अशा गोष्टी असतात की चांगलं वागलं पाहिजे. 

अशा प्रकारे आपण सुद्धा दिव्याप्रमाणे राहिलं पाहिजे. तर दिवा ह्याच्या मागे हाच संधी देत असतो. आणि दिवाळीला नवीन वर्ष साजरं केलं जातं. आपण त्याच्यात त्या दूर केल्या पाहिजेत. आपण बऱ्याचशा लोकांसोबत अबोलो असतो किंवा त्यांच्यासोबत आपले व्यवहार चांगले नसतात. तर या सर्व गोष्टी आपण याच वर्षी मागे ठेवून नवीन वर्षाला सुरुवात केली पाहिजे. अशा या प्रकारे नवीन वर्ष चालू केलं पाहिजे. तर मित्रांनो हि अशी दिवाळी खूप छान नेहमीच दरवर्षी आपल्याला संदेश देत असते. त्यामुळे आपण सुद्धा या दिवाळीचा छान संदेश आपण घेतला पाहिजे. तर चला तर मित्रांनो या दिवाळीला ही दिवाळी छान सुंदर साजरी करूयात आणि आपल्या स्वतःमध्ये छान विचार छान आचार त्याचबरोबर छान सवय लावून ही दिवाळी छान आणि आणखी मंगलमय करूयात.

या लेखात आपण “माझा आवडता सण दिवाळी” निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh In Marathi

Related Content :

17 thoughts on “दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh In Marathi”

Leave a Comment