माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध | Maza avadta rutu Hivala Marathi nibandh

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये माझा आवडता ऋतु: हिवाळा निबंध या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतु: पावसाळा  माहिती बघणार आहोत .

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध – भाग 1

हिवाळा ऋतु भारतात नोव्हेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत राहतो. हा ऋतु सर्व ऋतुंपैकी सर्वाधिक थंड असतो. जानेवारी महिन्यात तर कधी कधी तापमान 1 अंश सेल्सिअस पर्यंत चालले जाते. हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच थंड वारे वाहायला लागतात. थंडी पासून संरक्षणासाठी लोक गरम कपडे घालतात व रात्री जाडर रजाई पांघरूण झोपतात.

हिवाळा माझा आवडता ऋतू आहे कारणं या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते. सूर्याच्या तापत्या उष्णतेपासून मुक्ती मिळते. जेव्हा अधिक थंडी वाढायला लागते तेव्हा शाळेला हिवाळी सुट्टी दिली जाते. या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनून जातात. न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. या दिवसात रात्र मोठी व दिवस लहान होत जातात.

भारतात हिवाळ्याचा हिमालय पर्वताशी संबंध आहे. जेव्हा हिमालयात बर्फ पडतो आणि उत्तरे कडून वारे वाहायला लागतात तेव्हा भारतात हिवाळ्याचे आगमन होते. हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुके तयार होते, यामुळे बऱ्याचदा बाहेरचे काहीही दिसत नाही. म्हणून विमान, रेल्वे व इतर वाहतूक सेवा थांबवल्या जातात. हिवाळ्यात उत्तरे कडे बर्फ पडतो सोबतच कडाक्याची थंडी पण वाजते. लोक ठीक ठिकाणी आग लाऊन शेकोटी करतात.

कडाक्याच्या या थंडीत गरीब लोक अधिक प्रभावित होतात. योग्य सुविधा नल्यामुळे बऱ्याचदा त्यांचा मृत्यूही होतो. सर्दी खोकला या सारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात.

गरम अन्न, फळ, मिठाई व स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. अन्य ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा जास्त प्याली जाते. या ऋतूत भाजीपाला देखील जास्त असतो. दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या सारखे उत्सव देखील हिवाळ्यातच येतात. 

माझा आवडता ऋतु: हिवाळा निबंध – भाग 2

पावसाळा संपल्यानंतर येणारा ऋतू म्हणजे सर्वांचा आवडता हिवाळा. ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्या दरम्यान हिवाळा ऋतू येतो. ऊन, पाऊस आणि थंडी यांचा अनुभव अनुभ- वायचा असल्यास हिवाळा ऋतू शिवाय पर्याय नाही. हिवाळा ऋतु हा सणांचा ऋतू म्हणून ही ओळखला जातो. नवरात्री, दसरा, दिवाळी भाऊ, बीज, ख्रिसमसे, मकर संक्रात असे अनेक सण हिवाळ्यामध्ये येतात. म्हणूनच याला ‘सणांचा ऋतू’ असे म्हटले जाते.

हिवाळा ऋतू प्रमुख ऋतूंपैकी एक आहे. पावसाळा. संपत आला कि वातावरणात प्रत्येकाला हवा-हवासा वाटणारा मंद गारवा जाणवू लागतो. हाच गारवा पुन्हा जोर धरू लागतो आणि सर्वत्र कडाक्याची थंडी निर्माण करतो. निसर्ग प्रेमी तर हिवाळा ऋतूची वाटच पाहत बसलेली असतात. सर्वत्र असणारे थंडीचे साम्राज्य, गवतावर पडलेले दवबिंदू व त्यातून निर्माण झालेले सप्तरंगी इंद्रधनुष्य, विलोभनीय धुके व त्यात जाणवणारी गुलाबी थंडी, रात्रीचा मंद गारवा सर्वांना हवाहवासा वाटतो. या ऋतूमध्ये निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. थंडीच्या दिवसा मध्ये बाजारपेठांमध्ये एकच गर्दी असते ते म्हणजे स्वेटर खरेदीसाठी प्रत्येकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर खरेदी करतात .  प्रत्येक जण शेकोटी पेटवून आपले थंडीचे शरीर गरम करण्याचा प्रयत्नकरतात

हिवाळा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. या ऋतूमध्ये भूक भरपूर लागते तसेच खाल्लेलं अन्न पचन 11 होते. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा प्राप्त होते. म्हणूनच या ऋतू ला ऊर्जा साठविण्याचा ऋतू ही म्हणतात या ऋतू मध्ये तहान कमी लागते, शरीराची दमछाक होत नाही, शरीरास खूप घाम येत नाही, दिवसभर ताजेतवाने असल्यासारखे वाटते. या ऋतूमध्ये सर्वजण गरमा-गरम पदार्थ खाण्याचा आनंद घेतात. एकंदर सर्व नागरिकांसाठी तसेच पर्यटनासाठी हिवाळा ऋतु अत्यंत महत्वाचा आहे . हिवाळा ऋतूमध्ये जास्तीत जास्त पर्यटन क्षेत्राचा विकास होतो .

अनेक पर्यटन स्थळांना यात्रेचे रूप येते. सग‌ळा परिसर गर्दीने फुलून जातो, डोंगर, दऱ्या, नद्या, उंच धबधबे आणि सर्वत्र दिसणारा हिरवागार निसर्ग यामुळे निसर्गाचे दिसणारे सुंदर मोहक रूप, सौंदर्य पाहण्या साठी अनेक दूर हून लोक प्रामुखाने येतात. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सकाळच्या थंडीत चालण्याचा तसेच व्यायाम करण्याचा आनंद सर्वजण घेत असतात

एकंदर हिवाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे.मलाही हिवाळा ऋतू खूप-खूप आवडतो.

या लेखात आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Related Content :

 

Leave a Comment