मला पडलेले स्वप्न मराठी निबंध :नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये मला पडलेले स्वप्न निबंध मराठी या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्येमाझा मला पडलेले स्वप्न माहिती बघणार आहोत .
निबंध सुरु करण्याआधी सर्वप्रथम निबंधामध्ये या महत्त्वाच्या ओली असणे फार गरजेचे आहे ,
मला पडलेले स्वप्न निबंध मराठी
असं म्हणतात ,
“स्वप्न झोपू देत नाहीत.. आणि झोप … स्वप्न पूर्ण होऊ देत नाही. ”
– Manisha Bhagwan Sawle
स्वप्नांबद्दल काय बोलावे ….मला आज पर्यंत अनेक चित्र विचित्र स्वप्न पडली …..कधी भूतानी येऊन भीती घातली तर कधी विचित्र दिसणाऱ्या माणसाने हसवलं पर्यांनी जादूनगरीत नेलं तर परीक्षेत अंडी भेटली ……काय काय नाही झालं स्वप्नात . त्यापैकीच एक स्वप्न मला कला पडलं .
काल रविवार होता आणि आज मला भरपूर कामे होती काय आहे न हप्त्या भराची पूर्ण कामे आम्ही रविवारीच करत असतो जसे की बाजार आणणे, राशन आणणे, घराची सफाई आणि बरीच सारी छोटीमोठी कामे असतात.
दिवसभर घराची सफाई आणि संध्याकाळी बाबांसोबत बाजारात जाऊन सामान घेवून आलो. मी फार दमलो होतो. मग आईच्या हातचे स्वादिष्ट जेवण जेवून मन तृप्त झाले. मग आम्ही आवारात झोपण्याची तयारी करून आपआपल्या बिछान्यावर पडलो. बिछान्यावर पडताच माझी नजर निरभ्र चांदण्या नी लख्ख अश्या आकाशाकडे गेली.त्या लुकलुकनाऱ्या चांदण्याकडे पाहून माझे मन खूपच प्रसन्न झाले व दिवसभराचा शीण उतरल्या सारखं वाटत होतं.
सगळेजण झोपी गेले होते. मी आकाशाकडे चांदण्या बघत होतो व त्यासोबतच मी आजीबाई ची सुद्धा खाट बघत होतो. चांदण्या मोजता मोजता मला काही वेगळाच प्रकार आकाशात दिसू लागला. मला असे दिसले की काही चांदण्या एकमेकांच्या जवळ येत होत्या व त्या चांदण्या चक्क माझे नाव आकाशामध्ये लिहित होते ते दृश्य पाहून एक क्षण मी आश्चर्यचकित झालो. पण यासोबतच मला कुतूहल वाटलं आणि फार आनंदही वाटला.
पुढे त्या चांदण्या एक एक करून माझ्याजवळ पृथ्वीवर येत होत्या. मी त्या चांदण्याला जेव्हा अलगत उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या माझ्या हातातून निसटून त्यांनी चक्क एक रथ तयार केला. व त्यात एक रथ चालवणारा मोरक्या बसला होता. मला त्याने रथांमध्ये बसण्याकरिता लावले, आणि मग मी रथामध्ये बसून आकाशाच्या दिशेने वरच वर उंचच-उंच गेलो.
आणि त्या रथ चालवणाऱ्या मोरक्याने मला थेट चंद्रावरती नेऊन उतरवले चंद्रावर पोहोचताच मी तरंगू लागलो. चंद्रावर फारच गारवा होता मी तरंगत तरंगत इकडेतिकडे फिरता फिरता थोडे समोर गेल्यावर मला चंद्रावरील एक सुंदर ससा दिसला. पांढराशुभ्र मऊ लुसलुशीत व इवल्याशा तोंडाचा ससा पाहून मला त्याचा मोह सुटला.
मी त्याला पकडण्याकरिता त्याच्या मागे मागे तरंगत तरंगत पळू लागलो तो पण ससा पळू लागला. व एका ठिकाणी जाऊन थांबला. तो परिसर फारच रमणीय सुंदर होता. ठिकठिकाणी झाडे होती तेही चांदण्यांनी माखलेली होती. त्या झाडांचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरला होता.
मी त्या बगिच्यात इकडे तिकडे तयार करून फिरू लागली MASTER माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माझ्या आयुष्यातील मी पहिल्यांदाच असे विलोभनिय दृश्य पाहत होतो. त्या बगिच्यातला एका कोपऱ्यात माझी नजर पडली व मी त्या दिशेने तरंगत जाऊ लागलो. तिथे पोहोचल्यावर मला दिसले की तिथे बरेच निरनिराळे खायचे पदार्थ होते त्यामध्ये लाडू पेढे जिलेबी इत्यादी निरनिराळे पदार्थ असतानाही माझी आई तिथे दुधाचा ग्लास घेऊन उभी होती.
व ती मला ते दूध पिण्यास आग्रह करू लागली मी नकार देत तेथून पळत होतो व पळता पळता माझा पाय कुठेतरी अडकला आणि मग मी आदळलो व जेव्हा उठून पाहिले तर मी कुठे गेलो नव्हतो मी माझ्या बिछान्यावर उठून खाली पडलो होतो तेव्हा मला कडू झाली की मी चंद्रावर साक्षात गेलो नसून मी एक स्वप्न पाहत होतो. ते स्वप्न बघून मी शुद्धीवर आल्यानंतर मला माझाच खूप हसू आल.
हा एक अद्भुत आणि रोमांचक अनुभव आणि एकदम वेगळा अनुभव होता . त्या स्वप्नातील अनुभवांनी माझ्या जीवनात नवीन प्रेरणा आणली आणि मला माझ्या आंतरिक विचारांची आणि भावनांची जाणीव करून दिली. स्वप्नं आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग असतात आणि ती आपल्याला नवीन दिशा दाखवतात. मला पडलेलं हे स्वप्नही त्याच प्रकारचं होतं. मी हे माझा स्वप्न सगळ्यांना सांगितलं आणि सगळे हसायला लागले .
या लेखात आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Related Content :
- mahatma jyotiba phule speech in marathi | महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण
- दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh In Marathi
- माझी शाळा निबंध | mazi shala marathi nibandh
- मराठी निबंध लेखन | Essay writing in Marathi
- प्रदूषण एक समस्या निबंध | Pradushan ek samasya marathi nibandh
- माझा आवडता कलावंत मराठी निबंध | maza avadta kalavant nibandh in marathi