माझा आवडता कलावंत :नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये माझा आवडता कलावंत या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्येमाझा आवडता कलावंत माहिती बघणार आहोत .
निबंध सुरु करण्याआधी सर्वप्रथम निबंधामध्ये या महत्त्वाच्या ओली असणे फार गरजेचे आहे ,
माझा आवडता कलावंत -निबंध १
“ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भरलो पानी”
ह्या गाण्याने पं. नेहरूंच्याही डोळ्यात पाणी आणणारी स्वरगान कोकिळा लता मंगेशकर ही माझी आवडती कलावंत आहे.
भारतीय गायिकात लता दीदीच्या तोडीची गायिका दुसरी झालीच नाही, असे कुमारगंधर्वासारखेच माझेही मत स्पष्ट आहे. लतादीदीमुळे चित्रपटसंगीताला विलक्षण लोकप्रियता लाभली. इतकेच नव्हे तर शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. आजकालची चिमुरडी पोर देखील सुरेल गुणगुणतात, ही लतादीदीचीच किमया होय. सर्वसामान्य लोकांनाही त्यातील सूक्ष्मता कळू लागली आहे. याचा अर्थ लतादीदीने नव्या पिढीचे गाणे संस्कारित केले. शिवाय सामान्य माणसाची संगीतविषयक अभिरुचीही घडवली .
माणसात जशी माणुसकी हवी तरच तो माणूस म्हणून ओळखला जातो तसे गाण्यातही गाणेपण हवे तरच ते खरे गाणे. लतादीदीचे कुठलेही गाणे घेतले तरी त्यात हे गाणेपण शंभरटक्के आढळते. कारण लतादीदीच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या स्वरांचा निर्मळपणा व निरागसपणा होय. गायिका अनेक आहेत पण कुणाचे स्वर अनुनासिक, कुणाचे थिटे तर कुणाचे कृत्रिम आहेत. लतादीदीच्या स्वरात जी कोवळीक व जो मुग्धपणा आहे तो इतरांच्या स्वरात नाही.
“गंगा-यमुना डोळयात उभ्या का?
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा “
लतादीदीच्या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे नादमय उच्चार. तिच्या गीतामध्ये दोन शब्दातले अंतर स्वराची आस ठेवून फार सुंदर रीतीने भरून काढलेले असते. जणू ते दोन्ही शब्द निमुळते होऊन एकमेकांत मिसळतात, सलग एकजीव होतात. ही गोष्ट फार अवघड आहे. पण लतादीदीच्या बाबतीत ती अत्यंत सहज आणि स्वाभाविक होऊन बसली आहे. या दृष्टीने
‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’
या गाण्याचा एक नमुना म्हणून उल्लेख करता येईल.
मैफलीतल्या गाण्याचा सारा रस लतादीदीच्या तीन मिनिटांच्या गाण्यातूनही पुरेपूर रीतीने आस्वादता येतो. तिचे एकेक गाणे ही एक संपूर्ण कलाकृती असते. स्वर, लय, शब्दार्थ यांचा तेथे एक मनोन मे गालेला असतो आणि मैफलीची बेहोशीही त्यात सामावली असते. ‘ मखमली तारुण्य माझे तू पहा भटांचे तिले भागलेले गीत याचे उदाहरण म्हणाल सांगता येईल.
केशवसूत ‘आम्ही कोण’ या तेत म्हणतात, ‘ आम्हाला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे ‘ गायन क्षेत्रात लग्नाच्या बाबतीत हे सर्वार्थाने खरे आहे. अभिजात लता मंगेशकर ही चित्रपटसंगीताची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे. गेले अर्धशतक ती जनमनावर सतत प्रभुत्व गाजवत आहे. भारतात तिचे गाणे घरोघरी जाऊन पोचले आहे, पण भारताच्या बाहेरही युरोप, मध्य आशिया आणि इतरही देशात तिचे गाणे ऐकून लोक वेडे होतात.
वडिलांकडून लाभलेले स्वरवैभव लतादीदीने आपल्या बुद्धिमत्तेने व परिश्रमाने कसदार केले. तिच्या गाण्याला जीवनविषयक जाणिवेचे एक वेगळे परिमाण लाभले आहे. लता दीदी कोकिळेसारखी आहे; हा विचार आला की आठवतात तिने गायलेल्या ओळी
“एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक…
तो राजहंस एक”
माझा आवडता कलावंत -निबंध २
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कलेची आवड असते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, कविता, लेखन, नाटक अशा अनेक विविध कला माणसाच्या अंगी जोपासलेल्या असतात. त्या कलेला साधून ती कला उत्तम करणारा कलाकार हा आपला आवडता आणि आपला आदर्श कलाकार असतो.
पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे हे माझे आवडते कलावंत आहेत. ते एक लोकप्रिय मराठी लेखक, लेखक, नाटककार, नट, नट, विनोदकार, कथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक असे विविध पैलू असणारे व्यक्तीमत्व होते. पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी दुरचित्रवाणी, चित्रपट, नभोवाणी, एकपात्री – बहुपात्री नाटक अशा सर्व क्षेत्रात काम केले.
पु. ल. देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ साली मुंबईतील गावदेवी या भागात झाला.
संगीत, लेखन, कविता अशा कविता अशा वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. शाळेत असताना आजोबांनी लिहून दिलेले १०- १५ ओळींचे भाषण खणखणीत आवाजात म्हणून दाखवायचे पण काही वर्षांनंतर ते स्वतःचे भाषण लिहू लागले.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी राजा बढे यांच्या ” माहेरा जा” या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. साहित्य क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते.
१९३७ पासून पु. ल. देशपांडे यांनी छोटया- मोठया नाटिकांत भाग घेण्यास सुरवात केली. १९४४ साली पु. लं. नी अभिरूची या नियतकालिकेतून “भैया नागपूरकर” हे पहिले व्यक्तीचित्र लिहिले. १९४६ साली त्यांचा सुनिताबाईंशी विवाह झाला.
१९४७-१९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम करायला सुरवात केली. वंदे मातरम्, दूधभात, गुळाचा गणपती या चित्रपटांमध्ये त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. तसेच चोखामेळा, देव पावला, दूधभात, देवबाप्पा, नवराबायको, मोठी माणसे अशा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन ही त्यांनीच केले.
मध्ये पु. ल. देशपांडे आकाशवाणीत नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या. १९५६ – १९५७ मध्ये त्यांची प्रमुख नाटय निर्माते म्हणून बढती झाली आणि ते दिल्लीला रवाना झाले. तिथे त्यांनी व सुनिताबाईंनी गडकरी दर्शन कार्यक्रम सादर केला.
त्यातूनच “बटाटयाची चाळ” या अदभुत कलाकृतीचा जन्म झाला. त्याचसोबत “भाई व्यक्ती की वल्ली”, “असा मी असामी” अशी त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
पु. लं. नी लोकनाटयाचा, व्यक्तीचित्रांचा, विनोदी कथांचा अनमोल ठेवा आपल्याला दिला, हे आपले खूप मोठे भाग्य आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांची पत्नी सुनिताबाई यांनी सुध्दा मोलाची कामगिरी बजावली. त्यांना पदम्भूषण, पदम् श्री, महाराष्ट्रभूषण या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
असे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व १२ जून २००० साली अनंतात विलीन झाले. आपल्या कलेचा वापर करून, लोकांना नेहमी हसवणारे, लोकांच्या मनावर राज्य करणारे ते एक थोर व्यक्तीमत्व होते.
या लेखात आपण माझा आवडता कलावंत निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Related Content :
2 thoughts on “माझा आवडता कलावंत मराठी निबंध | maza avadta kalavant nibandh in marathi”