दसरा मराठी निबंध | Marathi essay Dasara in Marathi

दसरा मराठी निबंध : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये “माझा आवडता सण दसरा” या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये दसरा म्हणजे काय दसरा का साजर केली जाते या सर्व माहिती बघणार आहोत .

निबंध सुरु करण्याआधी सर्वप्रथम निबंधामध्ये या महत्त्वाच्या ओली असणे फार गरजेचे आहे ,

“मतभेद अन् धर्म भेद,

समूळ तुम्ही हो विसरा…

एकजुटीचा विजय सदाही,

सांगतो आहे दसरा…..”

सत्याचा असत्यावर, प्रकाशाचा अंधकारावर मिळणाऱ्या विजयाचे प्रतिक म्हणजे आपला ‘विजयादशमी’ चा सण. या सणाला आपण ‘दसरा’ असेही म्हणत असतो. आपल्या भारत देशासह नेपाळ या देशातही दसरा सण उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी हा सण आश्विन शुद्ध दशमीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असणाऱ्या दसरा सणाचे आपल्या धर्मात खूप महत्त्व आहे. हा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते, त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजे दसरा दसरा या सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात.

 या दिवशी अनेकजण शुभकार्याला सुरुवात करतात.विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची दसऱ्याच्या दिवशी पूजा केली जाते. शस्त्रास्त्रांची, शेतीतील लोखंडी अवजारे, वह्या पुस्तकांची, तसेच आपट्याच्या किंवा शमीच्या झाडाची पूजा केली जाते. नवी वाहने, वास्तू, कपड्यांची, तसेच सोन्याची खरेदी केली जाते. नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. घराला आंब्याच्या पानाचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधतात .

प्राचीन काळापासून क्षत्रिय युद्धाला जाण्यासाठी

दसरा या दिवसाची निवड करत होते, त्यांचे म्हणणे असे असायचे की, दसऱ्याच्या दिवशी केलेल्या युद्धामध्ये विजय निश्चित मिळतो.

 श्रीरामानी रावणाचा वध याच दिवशी केला. त्यामुळे सत्याचा असत्यावर विजय यानुषंगाने आपण विजयादशमी सण साजरा करतो . माँ दुर्गाने महिषासूराचा वध करून कुविचारांना संपुष्टात नेले, ते याच दिवशी. पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी त्यांची शस्त्रे झाडावरून खाली काढली तेही याच दसऱ्याच्या दिवशी. म्हणूनच आपण आपल्याकडील अवजारांची पूजा या दिवशी करतो.

दसरा सणाच्या शुभेच्छांसोबत नेहमी आपट्याची पाने देखील एकमेकांना  दिली जातात . दसरा हा सण भारताच्या विविध प्रांतात विविध पद्धतीने साजरा केला जातो त्यातलीच एक पद्धत जी महाराष्ट्रात अनुसरली जाते ती म्हणजे शुभेच्छे सोबत आपट्याची पाने देणे . ज्याला सोनं असा मानलं जातं आणि या रीतिला सोनं लुटणं असं म्हटलं जातं . आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला महत्त्व दिलं जातं . आपट्याच्या पानाच्या झाडाचे शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा (Bouhinia racemosa)  आहे . या झाडाची पाने heart shape ची असल्याने पटकन ओळखू येतात , तसेच दसऱ्याच्या दिवशी या पानांना लुटतात म्हणूनच याला ” सोन लूट ” असेही म्हणतात .

पुराणानुसार दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना आणि झाडांना महत्वाचे मानले जाते . पुराणात लिहिले आहे की , फार पूर्वी वरतंतू  नावाचे एक ऋषी होते , आणि कौत्स्य नावाचा त्त्यांचा  शिष्य होता .

ऋषींच्या मार्गदर्शनाखाली त्याने १४ विद्या आत्मसात केल्या होत्या . आणि गुरु ऋणापासून मुक्त होण्यासाठी त्याने गुरूंकडे गुरुदक्षिणेचे विचारले . त्यावर गुरु त्याला म्हणाले की , तुझ्या विद्येचा वापर लोकांच्या कल्याणासाठी कर हिच माझी गुरुदक्षिणा . पण कौत्स्य काही ऐकेना मग गुरूंनी त्याला १४ विद्यांच्या बदल्यात १४ कोटी सोन्याच्या मुद्रा देण्यास सांगितले . एवढ्या सुवर्ण मुद्रा एकत्र करण्यासाठी कौत्स ने भगवान राम यांची मदत घेण्याचे ठरवले  आणि तो त्यांच्या कडे गेला . भगवान राम यांनी त्याला मदतीचे आश्वासन दिले व तीन दिवसांनी त्याला आपट्याच्या झाडाखाली जाऊन थांबायला सांगितले . भगवान रामांनी कुबेराच्या मदतीने त्या झाडाच्या पानांना सोन्यामध्ये बदलले . कौत्स्य ने ती पानं घेतली व १४ कोटी त्याच्या गुरूंना दिली व उरलेली पण लोकांमध्ये वाटली .

आपल्या मनातील मतभेद, गैरसमज दूर करून मनामनांना एकत्र आणण्याचा हा सण आहे. चला तर मग! वाईट विचारांवर विजय मिळवून, समाजाला  समाजाला एका बंधनात बांधून खऱ्या अर्थाने दसरा सण साजरा करूया.

या लेखात आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Related Content :

Leave a Comment