माझा आवडता खेळ फुटबॉल मराठी निबंध | Maza Avadta Khel Nibandh in Marathi 500 words

माझा आवडता खेळ फुटबॉल मराठी निबंध : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये माझा आवडता खेळ फुटबॉलया विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये माझा आवडता खेळ फुटबॉल  माहिती बघणार आहोत .

माझा आवडता खेळ फुटबॉल (500 words)निबंध मराठी

खेळामुळे आपले मन आणि शरीर तंदुरुस्त बनत असते. रोजच्या जीवनात एकतरी खेळ खेळणे आवश्यक आहेच. मी क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, बुद्धिबळ, कबड्डी हे खेळ खेळतो परंतु त्यामध्ये माझा सर्वात आवडता खेळ आहे फुटबॉल!

फुटबॉल हा विश्वभरात अत्यंत उत्सुकतेने खेळला जातो. फुटबॉल हा व्यक्तीला शारिरीकदृष्ट्या कणखर आणि सक्षम बनवतो. फुटबॉल पायाने टोलवणे आणि गोल पोस्टमध्ये ढकलणे यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतात. त्यातून मानसिक आणि बौद्धिक निर्णय क्षमता देखील हाताळली जाते.

पाश्चिमात्य देश फुटबॉल खेळात निपुण आहेत. विविध क्लब आणि देशांतर्गत स्पर्धा या संपूर्ण फुटबॉल जगतासाठी आकर्षणाचा बिंदू ठरतात. फुटबॉल खेळाच्या कसा सुरु झाला या  बद्दल म्हटले जाते की हा खेळ चीनी खेळ सुजू सारखा आहे, व सुजू पासूनच फुटबॉल विकसित झाला. पूर्वी जपान मध्ये असुका वंशाचे लोक फुटबॉल खेळत असत. या नंतर या खेळाचा विस्तार जगभरातील वेगवेगळ्या देशात झाला. भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव ‘नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी’ आहे. त्यांना ‘भारतीय फुटबॉल चे जनक’ म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले.  तसेच चार वर्षांतून एकदा फुटबॉल विश्वचषक देखील आयोजित केला जातो. लिओनेल मेस्सी हा माझा आवडता खेळाडू तर अर्जेंटिना हा माझा आवडता फुटबॉल खेळणारा संघ आहे.

फुटबॉल खेळाच्या कसा सुरु झाला या  बद्दल म्हटले जाते की हा खेळ चीनी खेळ सुजू सारखा आहे, व सुजू पासूनच फुटबॉल विकसित झाला. पूर्वी जपान मध्ये असुका वंशाचे लोक फुटबॉल खेळत असत. या नंतर या खेळाचा विस्तार जगभरातील वेगवेगळ्या देशात झाला. भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव ‘नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी’ आहे. त्यांना ‘भारतीय फुटबॉल चे जनक’ म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले.

आमच्या शाळेतही फुटबॉल खेळला जातो. आमच्या वर्गाचा मी कर्णधार आहे. वार्षिक क्रिडा स्पर्धेत आम्ही नेहमीच उत्तम खेळ करत असतो. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये या वर्षी आमच्या शाळेची टीम पाठवली होती. त्यामध्ये माझे प्रदर्शन समाधानकारक होते.

फुटबॉल खेळामध्ये दोन्ही संघात प्रत्येकी ११ खेळाडू असतात. एक गोलरक्षक असतो तर बाकीचे सर्वजण एका रणनीतीनुसार बॉल दुसऱ्या गोलमध्ये पाठवत असतात. दोन्ही संघाचे खेळाडू बचाव आणि आक्रमण करत असतात. जो संघ जास्त गोल मारेल तो संघ विजयी ठरतो.

फुटबॉल हा खेळ आयताकृती मैदानात खेळला जातो. हा खेळ ९० मिनिटांचा असतो ज्यामध्ये ४५ मिनिटानंतर विश्रांती असते. जर सामना ९० मिनिटांच्या खेळात बरोबरीत राहिला तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी अतिरिक्त वेळ देखील दिला जातो.

खेळताना फुटबॉलला हात लागणे हे नियमाविरुद्ध आहे. डोके, शरीर व पाय यांचा वापर करून फुटबॉल टोलवत राहायचे असते. सामन्याचे परीक्षण करायला आणि नियमांतर्गत खेळ होण्यासाठी पंच नेमलेले असतात. ते सर्व निर्णय देत असतात.

सध्या मी इंटरनेटवरून खेळाडूंच्या मुलाखती आणि त्यांची कौशल्ये बघत असतो. फुटबॉल जगतातील बातम्या वाचत असतो. मी सध्या दिवसातील दोन तास फुटबॉलचा सराव करतो. या खेळातील तीव्रता, समर्पण आणि चपळता यामुळे फुटबॉल हा माझा

या लेखात आपण माझा आवडता खेळ फुटबॉलया निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Related Content :

Leave a Comment