लोकमान्य टिळक मराठी निबंध : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये लोकमान्य टिळक निबंध मराठी या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये लोकमान्य टिळक निबंध बघणार आहोत .तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा .
लोकमान्य टिळक निबंध मराठी
“ शोभला तो ताठर बाणा
वज्रासम कणखर छाती
ज्यांच्या सिंह गर्जनेने एका
पेटल्या स्वराज्याच्या वाती”
माणूस असो वा प्राणी-पक्षी अगदी कुणालाही विचारा “तुम्हाला सर्व प्रथम काय हवे?” तर तो सांगेल नव्हे अगदी ठामपणे सांगेल “स्वातंत्र्य !” अगदी भुकेने कासावीस झालेल्या दरिद्री माणसापुढे तुम्ही एका हातात भाकरी अन् दुसऱ्या हातात स्वातंत्र्य घेऊन उभे राहिलात तरीही तो स्वांतत्र्याचीच किंवा एकाच वेळी दोन्हींची निवड करेल. तर सांगायचा मुद्दा हा की स्वातंत्र्य ही नैसर्गिक प्रेरणा आहे. ती तो मिळविल्याशिवाय राहात नाही. त्यासाठी संघर्ष करतो. प्रसंगी मरण पत्करतो!
आपला देश प्राचीन संस्कृती असलेला, उंच पर्वतमाला, नद्या नाल्यांनी आणि सुपिक जमिनी यामुळे समृद्ध असा देश होता. यामुळे सहाजिकच परकीयांची वाकडी नजर भारताकडे वळाली. पाचव्या सहाव्या शतकापासूनच भारतीय भूमीवर परकीय शासकांची धाड पडू लागली. त्यापूर्वी चंद्रगुप्ताच्या काळातही
ग्रीकांनी भारतावर आक्रमणाचा प्रयत्न केलेला होताच. पण तो त्यावेळी परतवून लावण्यात चाणक्य आणि त्यांची शिष्य मंडळी यशस्वी ठरली होती, पण आठव्या शतकापासून मुस्लिम सत्तेचा शिरकाव भारतात झाला. अन् बघता बघता अवघा भारत इस्लामी सत्तेच्या टाचेखाली आला.
याच स्वातंत्र्याच्या उपजत प्रेरणेच्या जोरावर अनेक देशांमध्ये चळवळी उभ्या राहिल्या. कारण माणूस सुरुवातीच्या काळात, जेव्हा तो अप्रगत अवस्थेत होता . तेव्हा मानवी समाजात “बळी तो कान पिळी” चे राज्य होते. म्हणजे जे सामर्थ्यवंत होते, ताकदवर होते ते दुबळ्यांवर राज्य करीत होते. त्यांना गुलाम करीत होते. यामुळे पृथ्वीतलावरील अनेक राष्ट्र पारतंत्र्यात होती. मग अनेक राष्ट्रांत आंदोलने सुरू झाली. त्यात भारतही होता.
पुढे सातशे – आठशे वर्षांनी इंग्रजांचे भारतावर आक्रमण झाले. अन् दीडशे दोनशे वर्ष पुन्हा वेगळ्या सत्तेखाली भारत भरडला गेला. एवढा काळ भारतीय माणूस पारतंत्र्यात राहिल्याने त्याची अवस्था दयनीय झाली होती. अन्याय, अत्याचाराने कळस गाठला होता. सर्व गृह उद्योग बंद पडले होते. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. गरिबी, रोगराई तर पाचवीला पुजली होती. शिक्षणाचा प्रचंड अभाव होता. अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा मनावर होता. धार्मिक कर्मकांड आणि परंपरांचे स्तोम माजले होते.
महाराष्ट्राचा विचार करता लोकांवर आपल्या विचारांचा प्रभाव टाकणारे पहिले प्रभावी नेते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य जहाल विचारांचे होते. केसरी, मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी आपली लेखणी तलवारी सारखी चालवली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळवणारच. ” अशी गर्जना त्यांनी केली. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा जहाल प्रश्न ते सरकारला विचारू लागले. यातूनच पुढे त्यांनी स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण ही चतुः सुत्री आणली अन् सारा भारत ढवळून निघाला.ते बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखले जायचे. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत, तर आईचे नाव पार्वतीबाई होते.
लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक संपादक व लेखक होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हटले होते. लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारले होते आणि म्हणूनच त्यांना ‘ लोकमान्य’ ही पदवी बहाल करण्यात आली होती. गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले होते.
लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार होते. त्यांनी 1872 मध्ये मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर 1876 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित आणि संस्कृत विषयाची पदवी पूर्ण करून 1879 मध्ये मुंबई विद्यापीठातून एल. एल. बी ची पदवी घेतली.
आपल्या देशातील साक्षरता वाढावी म्हणून, टिळकांनी -आपले वर्गमित्र आगरकर आणि थोर समाज सुधारक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सोबत 1 जानेवारी 1980 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. येथे त्यांनी विना वेतन शिक्षकी पेशा स्वीकारला. पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालय चालू केले. लोकमान्य टिळक हे गणित व संस्कृत विषय शिकवत असे.
लोकमान्य टिळक एक धाडसी राष्ट्रवादी नेता होते. त्यांनी सर्वात आधी ब्रिटिश राजवटीमध्ये ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हा नारा देऊन पूर्ण स्वराज्याची मागणी केली. व १९८० मध्ये भारतीय राजकारणात प्रवेश केला.
जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे आणि सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करण्यासाठी 1881 मध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून तर मराठा हे इंग्रजी मधून प्रसिद्ध होत होते. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सरकारविरुद्ध टीका करणे सुरू केले व देशातील जनतेला इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास प्रोत्साहित केले.
महाराष्ट्राचा विचार करता लोकांवर आपल्या विचारांचा प्रभाव टाकणारे पहिले प्रभावी नेते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य जहाल विचारांचे होते. केसरी, मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी आपली लेखणी तलवारी सारखी चालवली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळवणारच. ” अशी गर्जना त्यांनी केली. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा जहाल प्रश्न ते सरकारला विचारू लागले. यातूनच पुढे त्यांनी स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण ही चतुः सुत्री आणली अन् सारा भारत ढवळून निघाला..
त्यांच्या या कार्यामुळे ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर राजगद्रोहाचा आरोप लावला. व त्यांना सहा वर्षे
मंडालेच्या तुरुंगात कारावासाठी शिक्षा ठोठावली. येथेच त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला होता.
लोकमान्य टिळक महान स्वातंत्र्य सैनिका बरोबर ते चांगल समाज सुधारकही होते. त्यांनी बालविवाह, शिक्षणाचा अधिकार, विधवांचे विपणन करणे, अंधश्रद्धा यावर जनजागृती केली. लोक जागृतीसाठी 1893 मध्ये गणेशोत्सव सण साजरा करण्यास सुरुवात केली. महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंतीला व्यापक स्वरूप दिले. या सार्वजनिक उत्सवातून लोकांना एकत्रित करून ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी चालना दिली.
अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी देहवासान झाले. टिळकांच्या अंत्ययात्रेत लाखो लोक उपस्थित
होते. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या महान नेत्याला माझा शतशः प्रणाम.
या लेखात आपण लोकमान्य टिळक या विषयावर निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
Related Content :
- Mahatma Gandhi Speech in Marathi | महात्मा गांधी मराठी भाषण
- स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda Essay in marathi
- अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण | Shivaji Maharaj Speech in Marathi
- माझा आवडता खेळ फुटबॉल मराठी निबंध | Maza Avadta Khel Nibandh in Marathi 500 words
- माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध | Maza avadta rutu Hivala Marathi nibandh
- माझा आवडता कलावंत मराठी निबंध | maza avadta kalavant nibandh in marathi
- शालेय छोटे सुविचार मराठी | Chote suvichar Marathi