रक्षाबंधन निबंध मराठी | Raksha bandhan essay in marathi

रक्षाबंधन निबंध मराठी : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये रक्षाबंधन या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये रक्षाबंधन  माहिती बघणार आहोत .तरी तम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा .

रक्षाबंधन निबंध

||सण हा मांगल्याचा, सण हा प्रेमाचा 

सण हा बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण हा रक्षाबंधनाचा||

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणीच्या स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे.

उत्तर भारतात ‘कजरी पौर्णिमा’ पश्चिम भारतात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो. हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते.

राखी बांधण्याचा अर्ध ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बंधनाच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.

काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. 

आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे ही त्या मागची भावना आहे. बहिण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावा विषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे.

रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली याविषयी एक आख्यायिका आहे.

1) पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले तेव्हा इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सूची हिने विष्णू कडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली.

“स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा” असा महान संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबा पुरतेच मर्यादित ठेवले आहे .अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटुंबा पुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही.

2)महाभारतातील एका कथेनुसार, द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बोटाला झालेल्या जखमेवर आपली साडी फाडून बांधली होती. त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की तो तिच्या रक्षणासाठी सदैव ताठ राहील. याच कारणामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि रक्षणाची कामना करतात.

समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्या बहिणीने सख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्कर एखाद्या बहिणीने दुसऱ्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते..

रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर, भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरणा पोषक आणि पूरक आहे हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे. एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात.

 रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. स्त्री कितीही मोठी मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते हा तिचा दुबळेपणा नसून | भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.

रक्ताचे नाते असणारे भाऊ-बहीण असोत किंवा मानलेले असो पण या नात्या मागची भावना पवित्र व खरी आहे या नात्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. आपल्या देशात प्रेम आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.

॥ तोडे से भी ना तुटे,

ऐसा भाई बहन का अनोखा बंधन है,

इस बंधन को सारी दुनिया

कहती रक्षाबंधन है||

या लेखात आपण रक्षाबंधन या विषयावर निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Related Content :

Leave a Comment