राजमाता जिजाऊ निबंध मराठी : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये राजमाता जिजाऊ [Rajmata Jijau Nibandh in marathi]या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये राजमाता जिजाऊ माहिती बघणार आहोत .
राजमाता जिजाऊ निबंध :
“आयुष्य खर्ची घातले रयतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविण्यासाठी |
सतत झटत राहिलात रयतेचे स्वराज्य उभारणीसाठी ।
समईतील वातीप्रमाणे तेवत राहिलात शिवबांना घडविण्यासाठी |
चंदनाप्रमाणे झिजत राहिलात आदर्श महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी |
शिवरायांच्या जीवनमंदिराच्या तुम्ही ज्ञानज्योती ।
समस्त महाराष्ट्रीयांच्या तुम्ही क्रांतीज्योती ।
या जयंतीनिमित्त राजमातेला मनोभावे वंदन करतो कोटी कोटी…”
आज 12 जानेवारी…. स्वराज्यप्रेरिका, राजमाता मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती. जिजाऊ मातेला सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मासाहेब जिजाऊ या 17 व्या शतकातील मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या कर्तबगार राजमाता आणि राष्ट्रमाता होत्या.
शिवरायांसारखा आदर्श राजा घडवून रयतेला स्वराज्य प्रदान करणाऱ्या वीरस्त्री म्हणजे जिजाऊ, स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य संरक्षक संभाजी महाराज या तिघांनाही स्वराज्याच्या एका सूत्रात गुंफणारी आदीशक्ती म्हणजे मासाहेब जिजाऊ..
मध्ययुगात महाराष्ट्राच्या मातीत अन्याय अत्याचाराची रोवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार करणाऱ्या रणरागिणी म्हणजे जिजाऊ, गुलामगिरीच्या जोखडात खितपत पडलेल्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट दाखविणाऱ्या युगस्त्री म्हणजे जिजाऊ,
या काळात महाराष्ट्रातील जनता मोगलशाही, आदिलशाही या सत्तांच्या अन्याय अत्याचारात भरडली जात होती. प्रचंड जुलूम, अत्याचाराने रयतेला हैराण करून सोडले होते. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. सामान्य रयतेला या सत्तांच्या गुलामगिरीत राहण्यावाचून पर्याय नव्हता. अशा प्रतिकूल वातावरणात 12 जानेवारी 1598 रोजी आजच्या विदर्भातील, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी राजे लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी जिजाऊ असे ठेवले.
आणि पुढे हीच जिजाऊ स्वराज्यजननी, स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ म्हणून लौकिक पावली. महाराष्ट्र ही जशी वीरपुत्रांची भूमी
जिजाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे दाखवून दिले. जिजाऊंनी आपल्या शिक्षण आणि संस्काराव्दारे शिवरायांसारखा आदर्श राजा घडविला आणि शिवरायांनी शहाजी राजे व मासाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाराष्ट्र घडविला. म्हणून
म्हणावेसे वाटते, “ स्वराज्याचा जिने घडविला भाग्यविधाता…. धन्य धन्य ती जिजाऊ माता..”
खंबीर व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या राजमातेने बालशिवबाला सोबत घेऊन स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न फुलवले. खंबीर नेतृत्व, करारी बाणा व धाडसी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर त्या स्वराज्याच्या प्रेरक शक्ती ठरल्या. छत्रपती शिवाजी महाराज ‘जाणते राजे’ झाले, त्यामागे एक ‘जाणती आई’ जिजाई होती.
म्हणजेच शिवरायांच्या अनुपस्थितीत मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याला आणि स्वराज्यातील रयतेला महाराजांची कमतरता भासू दिली नाही. उलट या संकट काळात ही जिजाऊ माऊली अखंड स्वराज्याची सावली बनून राहिली.
अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, मिर्झाराजे यांच्या रूपाने स्वराज्यावर चालून आलेली अनेक संकटे जिजाऊंनी मोठ्या धैर्याने परतवली. या प्रत्येक संकटाच्या वेळी या मातेने शिवरायांना खंबीरपणे पाठिंबा दिला. शिवराय पन्हाळगडाच्या कैदेत असताना तर या मातेने प्रत्यक्ष लढण्याचीही तयारी दाखवली होती.
अशा या थोर मातेस आपला पुत्र स्वराज्याचा छत्रपती, मराठा पातशहा होताना पाहण्याचे भाग्य लाभले. मासाहेब जिजाऊंच्या आणि अखंड महाराष्ट्राच्या आशीर्वादाने शिवराय रायगडावर राज्याभिषेक करून स्वतंत्र व सार्वभौम स्वराज्याचे अधिपती बनले,
छत्रपती बनले.
जिजाऊ मासाहेबांनी लखोजीराव जाधवांची वीर कन्या, शहाजी राजांची वीरपत्नी, शिवाजी महाराजांची वीरमाता, संभाजी महाराजांची वीर आज्जी, अखंड स्वराज्याची सावली आणि समस्त , रयतेची माऊली अशा असंख्य भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या.
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर 11 दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याला पाचाड गावी या राजमातेने जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी केलेल्या स्वराज्य कार्यामुळे त्या अनंत काळापर्यंत अजरामर झाल्या आहेत.
“जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाची महान आहे गाथा म्हणून या जगती आजही अजरामर आहे.” या लेखात आपण राजमाता जिजाऊ या विषयावर निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
राजमाता जिजाऊ (जिजामाता) यांचे जीवन आणि कार्य मराठा इतिहासात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या जीवनावर आधारित काही सामान्य विचारले जाणारे प्रश्न (FAQ) खाली दिले आहेत:
1. राजमाता जिजाऊंचा जन्म कधी आणि कुठे झाला?
- उत्तर: राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले जिजाऊ येथे झाला.
2. राजमाता जिजाऊंचे खरे नाव काय होते?
- उत्तर: राजमाता जिजाऊंचे खरे नाव जिजाबाई होते. “जिजामाता” या नावाने त्यांना आदराने संबोधले जात असे.
3. राजमाता जिजाऊंचा विवाह कोणाशी झाला?
- उत्तर: राजमाता जिजाऊंचा विवाह शाहाजी भोसले यांच्याशी झाला. शाहाजी भोसले हे आदिलशाही साम्राज्यातील एक महत्त्वाचे अधिकारी होते.
4. राजमाता जिजाऊंचा मुख्य योगदान काय आहे?
- उत्तर: राजमाता जिजाऊंचे मुख्य योगदान हे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या शिक्षण, संस्कार आणि नेतृत्वात आहे. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांना स्वराज्य, वीरता, देशप्रेम, आणि नैतिक मूल्यांची शिकवण मिळाली. त्यांनी शिवाजी महाराजांना एक महान नेता, योद्धा आणि शासक बनवले.
5. राजमाता जिजाऊंच्या जीवनाचा शिवाजी महाराजावर काय प्रभाव पडला?
- उत्तर: जिजामातांनी शिवाजी महाराजांना स्वातंत्र्य, स्वराज्य, शौर्य आणि धर्माच्या महत्त्वाचे धडे दिले. शिवाजी महाराजांच्या शासकीय धोरणे आणि युद्ध नीतीत त्यांचे मार्गदर्शन आणि संस्कार दिसून आले. जिजामातांची मातृभूमी आणि धार्मिकता यावर असलेली निष्ठा शिवाजींच्या विचारधारेवर प्रगल्भ परिणाम करणारी होती.
6. राजमाता जिजाऊंचे योगदान मराठा समाजाच्या धर्म आणि संस्कृतीत कसे होते?
- उत्तर: जिजामातांनी मराठा समाजातील धार्मिकता, संस्कृती आणि परंपरांना महत्त्व दिले. त्यांचा विश्वास होता की स्वराज्य स्थापनेसाठी धर्म आणि संस्कृती यांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना या मूल्यांची शिकवण दिली.
7. राजमाता जिजाऊंच्या नेतृत्वात मराठा साम्राज्याच्या स्थापनेसाठी काय कार्य केले गेले?
- उत्तर: जिजामातांनी मराठा साम्राज्याच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराजांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रेरित केले आणि युद्धशास्त्र, रणनीती आणि प्रशासनाच्या बाबतीत त्यांना आवश्यक असलेली शिकवण दिली.
8. राजमाता जिजाऊंचे निधन कधी झाले?
- उत्तर: राजमाता जिजाऊंचे निधन 17 जून 1674 रोजी पुणे येथे झाले. त्यांचे निधन छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीच्या वेळेस झाले.
9. राजमाता जिजाऊंनी कोणती काव्य रचनाएँ किंवा साहित्य निर्माण केले?
- उत्तर: राजमाता जिजाऊंनी प्रत्यक्षपणे साहित्य किंवा काव्य रचनाएँ केली नसली तरी त्यांच्या जीवनावर अनेक काव्य रचनाएँ आणि गीतं लिहिली गेली. त्यांचे जीवन, त्यांची मातृत्व भावना आणि वीरता आजही भारतीय साहित्यिक काव्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.
10. राजमाता जिजाऊंच्या समर्पणाचे प्रतीक काय आहे?
- उत्तर: राजमाता जिजाऊंचे समर्पण हे मातृत्व, धर्म, देशभक्ती आणि स्वराज्याच्या रक्षेसाठी असलेल्या त्यांच्या योगदानाचे प्रतीक आहे. त्या एक आदर्श माता, नायक, आणि नेतृत्वाच्या प्रतीक होत्या.
11. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कोणते मुख्य शिक्षण दिले?
- उत्तर: जिजामातांनी शिवाजी महाराजांना निष्ठा, कर्तव्य, वीरता, स्वातंत्र्य आणि सत्यतेचा महत्त्व शिकवला. त्यांनी त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी एक दृढ आणि नीतिमान नेता बनण्याचा मार्ग दाखवला.
Related Content :
- Mahatma Gandhi Speech in Marathi | महात्मा गांधी मराठी भाषण
- स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda Essay in marathi
- अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण | Shivaji Maharaj Speech in Marathi
- लोकमान्य टिळक मराठी निबंध | Bal Gangadhar Tilak Essay in marathi
- माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध | Maza avadta rutu Hivala Marathi nibandh
- जालियनवाला बाग हत्याकांड माहिती | Jallianwala Bagh massacre in marathi
- शालेय छोटे सुविचार मराठी | Chote suvichar Marathi