स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda Essay in marathi

स्वामी विवेकानंद मराठी निबंध : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये  स्वामी विवेकानंद निबंध मराठी [Swami Vivekananda Essay in marathi]या विषयावर जबरदस्त आणि अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेलो आहे. आपण या लेखामध्ये  स्वामी विवेकानंद निबंध बघणार आहोत .

स्वामी विवेकानंद निबंध 

भारताला समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा वारसा मिळाला आहे. आयुष्यभर ते आपल्या देशासाठी काम करत राहिले. त्यापैकी एक रत्न स्वामी विवेकानंद यांना मिळाला आहे. स्वामी विवेकानंद हे एक महान समाजसुधारक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या उद्धारासाठी खर्च केले आहे.

बऱ्याच शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी भाषण आणि निबंध स्पर्धा आयोजित करतात. म्हणून आम्ही आपल्याला मदत करत आहोत स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल आणि त्यांना खऱ्या अर्थाने युवा प्रेरणा का म्हटले जाते याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आम्ही हा निबंध लिहिला आहे.

स्वामी विवेकानंद हे भारताच्या इतिहासातील नामवंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे कार्य भारताच्या इतिहासात मोठे योगदान म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जाते. ते एक भारतीय हिंदू भिक्षू होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जगभर तसेच हिंदुस्तानात हिंदू धर्माच्या विश्वास आणि श्रद्धेचा प्रसार करण्यासाठी घालवले.

स्वामी विवेकानंद हे भारताच्या इतिहासातील नामवंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे कार्य भारताच्या इतिहासात मोठे योगदान म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जाते. ते एक भारतीय हिंदू भिक्षू होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जगभर तसेच हिंदुस्तानात हिंदू धर्माच्या विश्वास आणि श्रद्धेचा प्रसार करण्यासाठी घालवले.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी 12 जानेवारी 1863 रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळे आपल्याला पुत्ररत्न लाभेल. अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव नरेंद्र असे ठेवले.

त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. स्वामी विवेकानंदाचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे “संस्कृत” व “परीक्षण” (पर्शियन) भाषेचे एक विद्वान होते.

नरेंद्रनाथ यांच्यावर लहानपणापासूनच महाभारत, रामायण व भक्तीभावाचा प्रभाव होता. कारण त्यांची आई त्यांना ह्या गोष्टी सांगत असे. स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती. ते शाळेत सुद्धा सर्वात हुशार विद्यार्थी होते. फक्त अभ्यासातच नाही तर ते खेळण्यात ही तितकेच तरबेज होते. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये ते भाग घेत असे.

स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी रामायण, महाभारत, भगवद्गीता, वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय गायन सुद्धा शिकले होते . स्वामी विवेकानंदांनी 1884 ला आपले शिक्षण पूर्ण करून “आर्ट्सचे” चे डिग्री मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला होता.

रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद ह्यांना घडवले होते आणि त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले होते. स्वामी विवेकानंद धार्मिक स्वभावाचे होते. त्यांना देशातील दारिद्र्य आणि अज्ञान पाहून खूप दुःख होत असे. भारतीय समाज सर्वसमर्थ बनला पाहिजे असे त्यांना नेहमीच वाटत असे.

स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार पूर्ण जगभर पसरवण्याचे काम केले होते. अमेरिकेमध्ये शिकागो येथे 1893 मध्ये सर्वधर्मपरिषद झाली होती. तेथे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. तेथे स्वामी विवेकानंदाचे भाषण ऐकून सर्व लोक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांच्या या भाषणामुळे हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार पूर्ण जगाला झाला होता आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद ही विश्व प्रसिद्ध झाले.

व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.

स्वामी विवेकानंदांचे बालपण अत्यंत आनंदात व वैभवात गेले. विशाल नेत्र आणि विशाल भाल लाभलेले स्वामी विवेकानंद अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सदृढ, निर्भय, विलोभनीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना अभ्यास, खेळ, व्यायाम, संगीत, काव्य, पाकशास्त्र अशा अनेक क्षेत्रात खूप रुची होती. लहान वयात आईकडून धार्मिक विचारांचे; तर मोठेपणी वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. सत्य वचन व सत्य आचरण हा तर त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.

भारतभ्रमणानंतर कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर बसून विचार असताना भारतातील दारिद्र, अज्ञानी जनतेसाठी सर्वस्व अर्पण करण अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले पाहिजेत, असे त्यांना तीव्रतेने जाणवू ला

१४-१५ वर्षांचे असताना अर्धाअधिक भारत यांनी पालथा घातला. त्या वेळी त्यांनी भारतीयांची केविलवाणी अवस्था पाहिली. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या, स्वत्व विसरलेल्या हिंदू समाजाला पाश्चात्त्य शिक्षणाने भारून टाकले होते. परकीयांच्या फसव्या सांस्कृतीक श्रेष्ठत्वाने भारतीय समाजाची दिशाभूल केली जात होती. हे सर्व पाहून विवेकानंद अत्यंत व्यथित व अस्वस्थ झाले.

रवींद्रनाथ टागोरांशी चर्चा करून आणि राजा राम मोहन रॉय यांची तत्वे विचारात घेऊन विवेकानंदांनी सर्व धर्माचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांचे इंग्रजी, संस्कृत, बंगाली इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. निरनिराळ्या धर्मातील, पंथातील विद्वानांशी त्यांनी तत्त्वज्ञानावर चर्चा केली. त्यांनी रामकृष्ण परमहंसाचे शिष्यत्व पत्करले.

विवेकानंद हे 1884 साली पदवीधर झाले रामकृष्ण परमहंसाच्या प्रभावामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि भिक्षेची झोळी घेऊन राष्ट्र कल्याणासाठी घराबाहेर पडले. अंतिम सत्य काय ? या एकाच विचार त्यांनी ध्यास घेतला आणि भारतभ्रमणाला सुरुवात केली.

अमेरिकेतील शिकागो शहरी 11 सप्टेंबर 1893 या दिवशी सर्वधर्मपरिषद भरणार होती. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तेथे उपस्थित राहिले. परिषदेच्या दिवशी विवेकानंदांनी माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो अशी भावपूर्ण शब्दांनी सुरुवात करून सभा जिंकली. त्यावेळी दोन मिनिटे सतत टाळ्यांचा गजर होत होता. या परिषदेत ते ज्या दिवशी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत विचारगर्भ भाषणाने हिंदू धर्माविषयीचे निबंध वाचत होते, त्या दिवशी ‘न भूतो न भविष्यती’ अशी गर्दी लोटली होती.

होमरूल लीगच्या नेत्या अॅनी बेझंट यांनी या प्रसंगी ‘एक योद्धा संन्यासी, समस्त प्रतिनिधींमध्ये वयाने लहान तरीही प्राचीन व श्रेष्ठ सत्याची जिवंत मुर्तीच असे स्वामी विवेकानंदाचे वर्णन केले आहे. विवेकानंदांनी खऱ्या धर्माची तत्त्वे सांगून धर्म हे उन्नतीचे साधन असावे असे प्रतिपादन केले.

परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून कोलकात्यात परतल्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. ‘माझ्या मोहिमेची योजना’, ‘भारतीय जीवनात वेदान्त’, ‘आमचे आजचे कर्तव्य’, ‘भारतीय महापुरुष’, भारताचे भवितव्य यासारख्या विषयावर त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंद यांनी परदेशी व स्वदेशी दिलेल्या व्याख्यानातुन आपली मते, वेळोवेळी ओजपुर्ण भाषेत मांडली. स्वामी विवेकानंदांच्या या विचारांचा फार मोठा परिणाम झाला. परदेशातही त्यांनी वेदान्ताच्या वैश्विक वाणीचा प्रचार केला जात होता. त्यामुळे आर्यधर्म, आर्यजाती, आर्यभूमी यांना जगामध्ये प्रतिष्ठा लाभली.

ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदू धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्यानंतर भारतभूमी व हिंदु धर्माची झालेली दुरावस्था रोखण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांची गरज आहे. याची जाणीव आपल्याला व्हावी, म्हणून 12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा आंतरराष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद हे संपूर्ण देशात एक महान देशभक्त आणि महान अध्यात्मिक मनुष्य होते, त्यांना जगामध्ये अस्सल विकास, जागतिक अध्यात्म आणि शांतता निर्माण करायची होती. स्वामी विवेकानंद यांनी वराह नगरात रामकृष्ण संघ स्थापन केला. तथापी नंतर त्याचे नाव रामकृष्ण मठ असे ठेवले गेले. रामकृष्ण मठ स्थापनेनंतर नरेंद्रनाथांनी ब्रह्मचर्य व संन्यास घेण्याचे व्रत घेतले आणि नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले.

परदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी फिरल्यावर स्वामीजी परत कलकत्त्यात आले त्यांनी श्री रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट देऊन आल्यावर 4 जुलै 1902 रोजी वयाच्या (३९ वर्षी) बेलुर मठामध्ये त्यांनी देहत्याग केला. कन्याकुमारी जवळ समुद्रात असलेल्या खडकावर स्वामीचे एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. शिवाय स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच 12 जानेवारी ह्याला ‘नॅशनल युथ डे’ स्वरूपाने संपूर्ण भारतभर साजरे केले जाते.

स्वामी विवेकानंदाचे काही विचार

१) जोपर्यंत आपण स्वत:वर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपण देवावर विश्वास ठेवू शकत नाही.

२) आपण दुर्बल आहात असा विचार करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

३) आपण आत्मा, मुक्त आणि चिरंतन, सदैवमुक्त, कधीही धन्य आहात पुरेसा विश्वास ठेवा आणि आपण एका मिनिटात मोकळे व्हाल.

४) आपल्या जीवनात जोखीम घ्या, आपण जिंकल्यास आपण नेतृत्व करू शकता! आपण हरल्यास, आपण मार्गदर्शन करू शकता!

५) ध्यान मुर्खाना संत बदलू शकते परंतु दुर्दैवाने मूर्ख कधीच ध्यान करीत नाहीत.

६) एकाग्रतेची शक्ती ही ज्ञानाच्या तिजोरीत राहण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे.

७ ) उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठण्यापर्यंत थांबू नका.

८) हृदय आणि मेंदू यांच्यात संघर्ष झाल्यास आपल्या हृदयाचे अनुसरण करा.

9) शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.

10) आपण जसे विचार करतो तसेच बनतो यामुळे आपण काय विचार करतो नेहमी लक्ष असले पाहिजे.

11) कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात यश त्यांनाच मिळते.

12) स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.

13) आपण जसे विचार करतो तसेच बनतो यामुळे आपण काय विचार करतो नेहमी लक्ष असले पाहिजे.

14) सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.

15) समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते

16) तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल बनाल आणि     सामार्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली बनाल.

17) स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात.

 या लेखात आपण  स्वामी विवेकानंद  या विषयावर निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Related Content :

3 thoughts on “स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda Essay in marathi”

Leave a Comment