कारगिल विजय दिवस माहिती मराठी :नमस्कार मित्रानो आपण आज या लेखामध्ये कारगिल विजय दिवस या विषयावर अतिशय जबरदस्त असा निबंध घेऊन आलो आहोत .कारगिल युद्धाचे पृष्ठभूमी भारतीय सैन्याचे शौर्य , कारगिल विजयाचे महत्त्व हे सर्व आपण या लेखामध्ये बघणार आहोत तरी तम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा .
कारगिल विजय दिवस माहिती
सन 1999 मे महिना तीन तारीख आणि स्थळ कश्मीर. एक गुरं चरणारा भारतीय सैन्याच्या छावणीत येतो आणि सांगतो की , काही सिविल ड्रेस मधले लोक आलेत आणि त्यांनी कारगिल सेक्टरमधील 11 हजार फूट उंच टेकडीवर तळ ठोकला आहे . स्पष्ट होतं सिव्हिल ड्रेस मध्ये आलेले ते दुसरे तिसरे कोणी नाही तर पाकिस्तानी घुसखोर होते , ज्यांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या बाजूने तळ ठोकला होता. बातमी छावणीतून वरपर्यंत पोहोचली गेली आणि ऑपरेशन विजय सुरू केले गेले . त्यालाच आपण कारगिल युद्ध म्हणून ओळखतो 1999 च्या मे ते जुलै या दोन महिन्यात झालेल्या संघर्ष काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात घडला म्हणून कारगिल युद्ध हेच नाव पडलं. या आधी काश्मीर पाकिस्तान कडून कश्मीर ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले . पण कारगिल युद्ध हे भारताला अस्थिर करणाऱ्या जिहादच्या च्या वीस वर्षाच्या मोहिमेतील एक टर्निंग पॉईंट समजला जातो.
या युद्धाचे तीन टप्पे होते . पहिला श्रीनगर ते लेह ला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर कंट्रोल ठेवण्याचा उद्देशाने पाकिस्तानी घुसखोरांनी महत्त्वाच्या मोठ्याच्या ठिकाणांचा ताबा घेतला होता पाकिस्तानी सैन्याने द्रास कारगिल टेकड्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
दुसरा भारताने घुसखोरी शोधून काढली आणि लगेचच प्रति हल्ल्यासाठी आपल्या सैन्याची जमाव जमव करायला सुरुवात केली . आणि तिसरा टप्पा म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष झाला. पण भारतीय सैन्याने आपल्या शौर्याने ऑपरेशन विजय हाती घेतलं आणि पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या समर्थकांचा पराभव केला. कारगिल भागात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याच्या कटामागे पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशरफ जबाबदार असल्याचा मानला जातो. या युद्धासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन विजयाची जबाबदारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुमारे दोन लाख सैनिकांवर सोपवली होती असं मानलं जातं. युद्धाचे मुख्य क्षेत्र असलेल्या कारगिल दास सेक्टर मध्ये सुमारे 30 हजार सैनिक उपस्थित होते
त्यावेळी लेफ्टनंट असलेले विक्रम बत्रा यांना 19 जून 1999 रोजी शिखर 5140 म्हणजे टायगर हिल वर परत ताबा मिळवण्याचे ऑर्डर मिळाली होती. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बात्रा आणि त्यांची टीम शिखरावर सही सलामत पोहोचली आणि त्यांनी शिखर 5140 काबीज केलं . हे मिशन भारतीय इतिहासातील सर्वात कठीण मिशन समजला जात .
असं म्हणतात की शत्रू असलेल्या पाकिस्तानी सैन्यामध्ये बत्रा यांच्या विषयी इतका दरारा होता की पाकिस्तानी सैन्यात जेव्हा सांकेतिक शब्दांची देवाण-घेवाण व्हायची तेव्हा बत्रा यांचा उल्लेख शेरशहा असा केला जात होता.
दरम्यान टायगर हिल हे ताब्यात घेतल्यावर बत्रा यांच्या टीमवर आता शिखर 4875 परत काबीज करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. हे शिखर काबीज करणं अत्यंत कठीण होत .
कारण या शिखरावर म्हणजे समुद्रसपाटीपासून 16,000 फुटावर पाकिस्तानी शत्रू दबा धरून बसलं होतं आणि हे शिखर चढण्यास अत्यंत कठीण होतं. वातावरणात प्रचंड धोका असल्यामुळे आपल्या सैनिकांची चढाई आणखीन कठीण होत चालली होती.
मोठं दुर्दैव म्हणजे या शिखरावर गेल्यानंतर परत कुठलाच जवान आपल्या घरच्यांशी संपर्क साधू शकला नाही . लष्कराच्या समर्थनार्थ भारतीय हवाई दलाने 26 मे रोजी ऑपरेशन सुरक्षित सागर सुरू केलं तर नौदलाने कराचीला पोहोचणाऱ्या सागरी मार्गावरून पुरवठा रोखण्यासाठी पूर्वेकडील भागांचा ताफा अरबी समुद्राकडे आणला.
बंदुका तोफगोळे आणि दारूगोळा यांच्यात जवळपास 80 दिवस दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने होते दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला त्यात पाकिस्तान ते जवळपास 500 सैनिक मारले गेले तर भारतीय लष्कराचे 527 जवान शहीद झाले आणि १३६३ जण जखमी झाले होते . पण शूर भारतीय सैनिकांमुळे हे युद्ध भारताने जिंकलं आणि 26 जुलै 1999 रोजी कारगिल मध्ये तिरंगा फडकला. त्यामुळे आज हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून आपण सगळेच साजरा करतो.
या लेखात आपण कारगिल विजय दिवस या विषयावर निबंध मराठी मध्ये बघितले. लेखामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
कारगिल विजय दिवस – माहिती (Kargil Vijay Diwas Information in Marathi)
1. कारगिल विजय दिवस काय आहे?
कारगिल विजय दिवस हा भारताच्या कारगिल युद्धातील विजयाचा उत्सव आहे, जो दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताने पाकिस्तानविरुद्ध 1999 मध्ये लढलेल्या कारगिल युद्धात प्राप्त केलेल्या विजयाची आठवण म्हणून साजरा केला जातो.
2. कारगिल युद्ध काय होते?
कारगिल युद्ध 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक मोठे संघर्ष होते. पाकिस्तानने भारताच्या कारगिल जिल्ह्यातील उंच पर्वतीय भागात प्रवेश केला आणि तिथे त्याने सैन्य तैनात केले. भारताने या आक्रमणाला धैर्याने प्रतिसाद दिला आणि नंतर लढाईत विजय मिळवला. युद्धात भारताने पाकिस्तानी सैन्याला पराभूत करत ताब्यात घेतलेल्या भागाला पुन्हा कब्जा केला.
3. कारगिल युद्धाची कारणे काय होती?
- पाकिस्तानने भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या कारगिल आणि आसपासच्या पर्वतीय भागात घुसखोरी केली.
- हे क्षेत्र दुर्गम आणि स्ट्रॅटेजिक दृष्ट्या महत्त्वाचे होते, कारण ते लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे स्थान होते.
- पाकिस्तानने, खासकरून “ऑपरेशन विजय” म्हणून ओळखल्या गेलेल्या कारवाईद्वारे भारतीय भूभागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.
4. कारगिल युद्ध कधी आणि किती काळ लढले गेले?
कारगिल युद्ध 1999 च्या मे महिन्याच्या सुरुवातीस सुरू झाले आणि 26 जुलै 1999 रोजी भारताने विजय मिळवला. या युद्धाचे कालावधी अंदाजे 2 महिन्यांचे होते.
5. भारतीय लष्कराचे कसे योगदान होते?
भारतीय लष्कराने अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती आणि उंचावर लढत असताना प्रचंड शौर्य आणि धैर्य दाखवले. लष्करी ऑपरेशनद्वारे भारताने पाकिस्तानी घुसखोरांना परत लोटले आणि विजय प्राप्त केला. विशेषतः भारतीय सैन्याने कडव्या पर्वतीय भागात आणि उंच ठिकाणी जिवंत राहून पाकिस्तानी ताब्यात असलेल्या क्षेत्रावर पुन्हा कब्जा केला.
6. युद्धात किती भारतीय शहीद झाले?
कारगिल युद्धात भारतीय सैन्याने 500 हून अधिक जवान गमावले. यामध्ये विविध सैन्य दलांचे जवान, तसेच भारतीय वायूदल आणि नौदलाचे कर्मचारी होते. या शहिदांचा बलिदान भारतीय सैन्याच्या वीरतेचे प्रतीक बनले आहे.
7. कारगिल विजय दिवस कसा साजरा केला जातो?
कारगिल विजय दिवस भारतातील सर्व लष्करी ठिकाणी, शहीद स्मारकांवर आणि मुख्य शहरांमध्ये साजरा केला जातो.
- समारंभ आणि परेड: 26 जुलै रोजी विशेष समारंभ आणि परेड आयोजित केल्या जातात.
- शहीदांना श्रद्धांजली: शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
- द्रष्ट्या ठिकाणी ध्वजारोहण: देशभरातील लष्करी आणि नागरिक स्थळांवर ध्वजारोहण केले जाते.
- प्रेरणादायी कार्यक्रम: शौर्य आणि बलिदानाची कहाणी सांगणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.
8. कारगिल विजय दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?
- सैन्याची शौर्य गाथा: कारगिल विजय दिवस भारतीय सैन्याच्या असामान्य शौर्य, धैर्य आणि कडव्या परिस्थितीमध्ये युद्ध करण्याची क्षमता दर्शवितो.
- राष्ट्रीय एकतेचा प्रतीक: या दिवशी, संपूर्ण भारतात एकजूट आणि देशभक्तीचा संदेश दिला जातो.
- गौरव आणि श्रद्धा: शहीद जवानांच्या बलिदानाची कदर करणे, त्यांच्या कर्तृत्वाला मान देणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना आदर देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
9. कारगिल युद्धाचे नंतरचे परिणाम काय होते?
- भारत-पाकिस्तान संबंध: कारगिल युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावग्रस्त झाले. दोन्ही देशांनी आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर करण्याचे धोरण ठेवले होते, त्यामुळे या युद्धामुळे आण्विक युद्धाचा धोका निर्माण झाला.
- सैन्य सुधारणा: कारगिल युद्धानंतर भारतीय सैन्याच्या धारणांमध्ये आणि रणनीतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या.
- आंतरराष्ट्रीय साक्षीदार: या युद्धाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सैन्याच्या क्षमतांबद्दल आणि आंतरराष्ट्रीय कुटनीतीच्या परिणामांचा एक महत्त्वपूर्ण संदेश दिला.
10. कारगिल विजय दिवसाचे राष्ट्रीय योगदान काय आहे?
कारगिल विजय दिवस भारतीय नागरिकांमध्ये एकजूट आणि देशभक्तीचा जोश निर्माण करतो. या दिवसाचे साजरे करणारे कार्यक्रम आणि सैन्याचे शौर्य दर्शवणारे आठवणी भारतीय समाजाच्या मनात अभिमान आणि प्रेरणा निर्माण करतात.
Related Content :
- Mahatma Gandhi Speech in Marathi | महात्मा गांधी मराठी भाषण
- स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda Essay in marathi
- अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण | Shivaji Maharaj Speech in Marathi
- लोकमान्य टिळक मराठी निबंध | Bal Gangadhar Tilak Essay in marathi
- माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध | Maza avadta rutu Hivala Marathi nibandh
- जालियनवाला बाग हत्याकांड माहिती | Jallianwala Bagh massacre in marathi
- शालेय छोटे सुविचार मराठी | Chote suvichar Marathi